ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ, शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

अहमदनगर

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघा साठीअधिकाधिक शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई व नाशिक विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर, 2023 व 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत मतदार नोंदणी करण्यात येणार असुन शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

मतदार नोंदणीसाठी मतदार हा भारताचा नागरिक असावा. मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर, 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षातील किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक असावा.

मतदार म्हणून नोंदणीसाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक आदी)

विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित कायदेशीर पुरावा जोडावा.

मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज क्र. 19 भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्वयंसाक्षांकित व पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणित करुन जोडणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठीचा अर्ज हा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे