ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगराजकियसामाजिक

अहमदनगर येथील केडगाव भागात सशक्त महिला उद्योग शाॅपिंग फेस्टिव्हल ची दिमाखात सुरुवात

अहमदनगर प्रतिनिधी

सशक्त महिला उदयोग व शॉपिंग फेस्टिवल – २०२३ या फेस्टिव्हल ची सुरुवात कु. धनश्री पोखर्णा व कु. नंदिनी नाटेकर या दोन काॅलेज च्या मैत्रिणींनी मिळून सशक्त महिला उद्योग स्थापन केले.

कु. धनश्री ही मुळात च पिढी जात व्यवसाय कुटुंबातील आहे.महिला घर सांभाळून आपल्या कलेसाठी किंवा व्यवसायासाठी इतक्या आवडीने सुबक चविष्ट पदार्थ किंवा सुंदर अशा वस्तू बनवत आहे. त्या वस्तू किंवा पदार्थ यांना वाव मिळण्यासाठी योग्य अशी ओळख मिळण्यासाठी त्यांना सशक्त महिला उद्योग ही कल्पना सुचली.

कु. धनश्री पोखर्णा व कु. नंदिनी नाटेकर या काॅलेज मध्ये शिकत आहेत.यांचे हे शाॅपिंग फेस्टिव्हल भरवण्याचे पहिलेच वर्ष आहे. इथुन पुढे नवरात्र, दिवाळी, दसरा या कालावधीत ही आम्ही शाॅपिंग फेस्टिव्हल भरवणार आहे. त्या बरोबरच महिलांना सपोर्ट करत त्यांना पुढे येऊन आपल्या प्रोडक्ट्स ची पब्लिसिटी कशी करायची याचे ट्रेनिंग ही देणार आहे. महिलां एकत्री करणा साठी वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत असे त्या दोघींनी सांगितले.

या शाॅपिंग फेस्टिव्हल चे उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम भैय्या जगताप, नगरसेवक मनोज दादा कोतकर, श्रीमती सुमनबाई गुंदेचा, श्री. दिपक बनसोडे, नगरसेवक महेश दादा गुंड, सौ. गिरीश जी जगताप, सौ. कविता भगत , सौ. सारिका सिद्दम – कुटुंब वृध्दाश्रम च्या संचालिका आदी मान्यवर उपस्थित होते.

संग्राम भैय्या बोलताना म्हणाले की ८ मार्चला च फक्त महिलांसाठी कार्यक्रम, विशेष महिलांचे‌ काम लोकां समोर आणून त्यांची प्रेरणा दिली जाते. पण खरं पाहायला गेले तर चुल मुलं फक्त हे एकच महिलांसाठी नाही.. महिलांसाठी खास हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले या दोन‌ काॅलेज च्या मैत्रिणींनी त्या साठी या युवा तरूणींना मनापासून शुभेच्छा देतो…

महिला या पुरुषाला मागे टाकून प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने पुढे येतात . आणि आपले कर्तृत्व सिद्ध करतात. त्या महिलांना सांगणे आहे की घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना मार्केट मध्ये उतरणे , आपल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.त्या सोबत संपूर्ण टीम वर्क असणे आवश्यक आहे.

आता आपल्या समोर सारिका सिद्दम यांचे उत्तम उदाहरण आहे त्या पद्मशाली महिला शक्ती च्या कार्यकारिणी सदस्य आहेत तसेच कुटुंब वृध्दाश्रम च्या ही संचालिका आहेत. तसेच पद्मशाली समाजातील लेडी पत्रकार म्हणून श्रुती बत्तीन-बोज्जा यांचे ही काम पत्रकार पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्या पेक्षा जास्त ही आहे. मिडिया क्षेत्र ह्या मध्ये टिकून राहणे महत्त्वाचे असते.

या शाॅपिंग फेस्टिव्हल मध्ये महिलांच्या हाताने बनवलेल्या सुबक वस्तु , चाट, आयुर्वेदिक ब्यूटी टिप्स महाराष्ट्रीयन डिशेस, अगरबत्ती , साड्या, ज्वेलरी , वेगळे वेगळे प्रोडक्ट्स ची माहिती, तसेच या सोबत मनोरंजन पर कार्यक्रम इतर गाणी, डान्स, रॅम्प वॉक अशाच अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

तसेच या कार्यक्रमात ३० उद्योजिका महिलांना सशक्त महिला उद्योग तर्फे उद्योग सर्टिफिकेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.दत्तात्रय वारकड यांनी केले होते.

तरी नगरकरांनी तसेच विशेषतः केडगाव मधील महिला वर्गांनी आवश्य भेट द्यावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

स्थळ:- छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय. अंबिका बस स्टॉप केडगांव अ.नगर.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे