ऍड दत्ता जाधव ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

सर्वच ऍक्ट मधील प्रश्न असतात..
माजलगाव प्रतिनिधी – किसन बी पवार
माजलगाव तालुक्यातील सादोळा या गावाचे वकील ऍड दत्ता जाधव यांनी डिसेंम्बर 2024 मध्ये झालेल्या A I B -19 या ऑल इंडिया बार च्या मार्च 2025 रोजी लागलेल्या निकालात घवघवीत यश मिळवून ते AIB परीक्षा पास झालेले असून ते माजलगाव तालुक्यातील एकमेव चर्मकार वकील असे आहेत की त्यांनी ए आय बी 2024-2025 परीक्षा पास केलेली आहे.यामुळे माजलगाव वकील संघ तसेच विविध पदाधिकारी, मित्रपरिवार, संघटना, नेते यांच्याकडून ऍड दत्ता जाधव यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर माहिती अशी की सादोळा खेडे गावातील एका गरीब कुटुंबातील दत्ता जाधव अथक परिश्रम घेत वकीली व्यवसायातील महत्वाची परीक्षा म्हणजे AIBही परीक्षा पास झालेले आहेत. त्यांचे शिक्षण जि प के प्रा शा व न्यू हायस्कुल शाळा सादोळा येथे झाले व सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव येथे ग्रॅज्युएशन पूर्ण करत LLB व LLM स्वातंत्र सेनानी रामराव आवरगावकर लॉ कॉलेज बीड या ठिकाणी पूर्ण केले व महाराष्ट्र आणि गोवा रजिस्ट्रेशन अँड सुदर्शन सोळंके आणि ऍड बी आर यांच्या आर्थिक मदतीने केले त्यामुळे वकिली व्यवसायातील महत्त्वाची ए आय बी 19 च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ॲड दत्ता जाधव उत्तीर्ण झाले आहेत..
त्यावेळी त्यांना ऍड वसंतराव सोळंके ऍड सुदर्शन सोळंके एड बी आर डक अँड महादेव जाधव ऍड वैभव सोळंके माजलगाव वकील संघातील सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले मला माझ्या गावाने जपलं आणि शिकवलं आई-वडील व बंधू भगिनींच्या आशीर्वादाने सर्व परिश्रम घेता आले..
जीवनातील प्रत्येक गुरूंच्या आशीर्वाद पात्र राहून प्रयत्न केले त्यामुळे हे सर्वात मोठे यश संपादन करता आले .
ऍड दत्ता सारजाबाई गणपतराव जाधव या सर्वांच्या कृपाशीर्वादाने हे यश मला मिळाले या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे.