ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘लेझर शो’ला परवानगी कोणता विभाग देतो ?उच्च न्यायालयाने मागवली माहिती

छत्रपती संभाजीनगर

गणेशोत्सवात ‘लेझर शो’मुळे तीन नागरिकांना दुखापत झाली आहे. या तिघांची दृष्टी गेल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणासंबंधी दाखल याचिकेवर न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. ‘लेझर शो’ला कोणता विभाग परवानगी देतो, यासंबंधी पुढील सुनावणीत माहिती सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

औरंगाबाद खंडपीठाने गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणासंबंधी खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रातील बारा जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. नियमानुसार आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला होता. गणेशोत्सव संपल्यानंतरही खंडपीठाने याचिकेचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.

याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रियांका शिंदे यांनी विविध वर्तमानपत्रातील वृत्तांचा आधार घेऊन, गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझरमुळे तीन गणेशभक्तांना दृष्टी गमवावी लागली, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने यावर महापालिकेचे वकील सुहास उरगुंडे यांच्याकडे विचारणा केली. अॅड. उरगुंडे यांनी लेझर शोला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचे स्पष्ट केले.

संबंधित अधिकार कुणाकडे आहे, यासंबंधी स्पष्टीकरण पुढील सुनावणीत द्यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे