ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

१० वी १२ वीच्या हॉलतिकिटावरील जात प्रवर्गचा निर्णय अखेर रद्द

मुंबई - दहावी बारावीच्या परीक्षांच्या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करणाऱ्या राज्य शिक्षण महामंडळाच्या निर्णयावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्रे लवकरच दिली जाणार आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करणाऱ्या राज्य शिक्षण महामंडळाच्या निर्णयावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी घेतला होता.मात्र लोकभावनेचा आदर करत, तो मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12 वीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रिकांचे वितरण सुरू झाले. त्यावर जातीचा उल्लेख असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यातच काही विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद चुकीची असल्याचेही निदर्शनात आले.

शाळेत प्रवेश घेताना जातीची चुकीची नोंद झाली असेल आणि पुढील प्रवेशासाठी विशिष्ट प्रवर्गातून प्रवेश घ्यायचा असेल तर जातीची योग्य नोंदणी आवश्यक असते. शाळेतील जातीची नोंद कळावी त्यामध्ये सुधारणा असल्यास शाळाचा सोडल्याचा दाखला घेताना त्यावर सुधारित जात यावी अशा उद्देशाने मंडळाने जातीचा उल्लेख केली होती.

या निर्णयाला सर्वच स्तरातून टोकाचा विरोध झाला. हॉलतिकीट हे त्या परीक्षेपुरते मर्यादित असल्याने त्यावर जातीचा उल्लेख कशाला हवा अशी भूमिका लोकांनी मांडली. तसेच विद्यार्थ्यांना जातीभेद करू नका असे शिक्षण दिले जात असताना, जातीचा उल्लेख हॉलतिकीटावर कशाला हवा अशी संतप्त भावना पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली. जातीच्या रकान्याला होणारा विरोध पाहता अखेर राज्य शिक्षण मंडळाने निर्णय रद्द करत असल्याची माहिती दिली.

नवीन हॉलतिकीटे उपलब्ध होण्याचा तारखा

विद्यार्थ्यांना आता जातीचा उल्लेख नसलेली हॉलतिकीटे लवकरच उपलब्ध होणार आहेत. इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पासून ही नवीन हॉलतिकिटे अॅडमिट कार्डच्या लिंकद्वारे डाऊनलोड करता येईल. तर 10 वीच्या विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटे दिली गेली नाहीत. त्यांना 20 तारखेपासून हॉलतिकिटे उपलब्ध केली जातील.

काही हॉलतिकिटांवर पेपर आणि सोडवण्याची भाषा यांच्या तपशिलांमध्ये चुका झाल्या आहेत. तर काही विद्यार्थ्यांच्या विषयांच्या नोंदी ही चुकल्या आहेत. या सर्व बाबी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर बदलता येतील असे राज्य शिक्षण मंडळांचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे