
सहजयोग ध्यानाने विदयार्थ्यांचे सुप्त कला गुणांचा विकास होतो- सुदर्शन शर्मा.
प. पू .माताजी श्री निर्मला देवी प्रणित दि. लाईफ इटरर्नल ट्रस्ट मुंबई संचालित, निर्मला धाम आरडगाव तालुका राहुरी या ठिकाणी इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमासाठी राहुरी तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अंदाजे 350 विद्यार्थी व पालक उपस्थिती होते.
या वेळी श्री हेमचंद्र मिस्त्री यांनी फाईन आर्ट या विषयातील करिअर संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन करत, नुसते सोशल मीडिया वर टाईमपास न करता मोबाइल गेमिंग,जाहिराती ,आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून विविध ॲप कसे तयार करायचे, त्यातून करिअर संधी कशी निर्माण होते त्यासाठी कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे, कुठली प्रवेशिका द्यायची याबद्दल मार्गदर्शन केले.
यानंतर मुंबईहून आलेले दि.लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबई चे ट्रस्टी श्री सुदर्शन शर्मा( सी ए), गोल्ड मेडलिस्ट, यांनी कॉमर्स क्षेत्रात करिअरच्या वेगवेगळ्या संधीबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच हे करत असताना परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेत सहज योग पद्धतीचे ध्यान केल्यास स्मरणशक्ती मध्ये कशी वाढ होते , अभ्यासात कशी प्रगती होते, जीवनामध्ये त्याचे काय फायदे होतात व हे ध्यान कसे करावे याची माहिती देऊन सहजयोग ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले. सहज योगाचे शैक्षणिक व मानवी जीवनात किती अनन्य साधारण महत्व आहे याबद्दल स्व अनुभवावरून माहिती दिली, भारत देशाची सध्याच्या आर्थिक विकासाच्या पॉलिसी नुसार कॉमर्सच्या माध्यमातून करिअर कसे होऊ शकते याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
सौ. स्वाती राऊत यांचा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये व करिअर कौन्सिलिंग मध्ये सोळा वर्षांचा प्रदीर्घ अनुभवानुसार बारावीनंतर जेईई, नीट सीईटी फाउंडेशन त्याचप्रमाणे नव्यानेच सुरू झालेल्या मॅथेमॅटिकल सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल व त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशिका याच्याबद्दल सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांना लक्षात राहावे यासाठी करिअर चार्टचे वाटप त्यांच्यातर्फे केले .
गोदागिरी फार्मचे फाऊंडर डायरेक्टर श्री ऋषिकेश औताडे यांनी एग्रीकल्चर विभागात करिअरच्या संधीबद्दल खेळी- मेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.
यानंतर निर्मल धाम तर्फे सर्व विद्यार्थी व पालकांनी या शैक्षणिक कार्यक्रमात सकाळी नऊ ते दोन या वेळेत अतिशय शांततेने भाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निर्मला धाम आरडगाव चे सर्व कार्यकारणी सदस्य युवाशक्ती ,बालशक्ती महिला शक्ती यांनी भाग घेतला
कार्यक्रमासाठी मुंबईहून दि लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबईचे ट्रस्टी श्री सुदर्शन शर्मा ,श्री प्रवीण सबरवाल, श्री विलास कथे पाटील , श्रीधर पै व अकाउंटंट श्री हितेश शहा उपस्थित होते.
कार्यक्रमाबद्दल सर्वांनी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचे आभार मानले.