ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या इलाक्षी ह्युंदाई मध्ये वाहन खरेदीचा नवा विक्रम, ह्युंदाईच्या 101 कार्सचे वितरण

अहमदनगर

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.

ग्राहकाचे सुहास्य वदनाने होणारे स्वागत, कर्मचाऱ्यांची विनम्र आणि तत्पर सेवा, सुमधूर संगीत, गाडी वितरणवेळी अभिनंदन गीत अशा उत्साहपूर्ण वातावरणाने शोरुमचा परिसर गजबजला होता.

ह्युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे 101 कार्सचे वितरण करण्यात आले. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या .

अनेक ग्राहकांनी मिळालेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केल. ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी ह्युंदाई बांधील असल्याचा विश्‍वास जनरल मॅनेजर राजू बेजगमवर यांनी व्यक्त केला. प्रथम गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.

ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी, ह्युंदाई ॲपसह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला.यावेळी सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी गाडीच्या पुढील सेवेसाठी इलाक्षी ह्युंदाई कायम कटी बद्ध राहील सांगितले. यावेळी ग्राहक,शोरूमचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे