
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यात आता पुढील 24 तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात थंडीची तीव्रता वाढली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यातच आज रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.