ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यात सरकारी रुग्णालयात अपुऱ्या सुविधांच्या अभावामुळे मृत्युतांडव

अहमदनगर

जबाबदार राज्य सरकार..

राज्यातील नांदेड,नागपूर,औरंगाबाद, अहमदनगर व ठाणे येथे सरकारी रुग्णालयात अपुऱ्या सोयी सुविधा आणि खालावत जात असलेला सार्वजनिक आरोग्य सुविधेच्या स्तरामुळे अनेक ठिकाणी सरकारी रुग्णालयात एका दिवसात अनेक रुग्णांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. या विरोधात अ,नगर येथे विरोध निदर्शने करण्यात आली.

दरम्यान बोलत असताना भारताचा क्रांतीकारी कामगार पक्षाच्या वतीने कॉम्रेड अविनाश साठे यांनी आपले मत मांडत असताना सांगितले की, “आज घडीला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उध्वस्त करण्यात सरकारची सर्वांना आरोग्याच्या व्यवस्थेप्रती प्रचंड अनास्था आणि त्यातून तयार होणारे धोरणे व खाजगी रुग्णालयात प्रचंड लुटीची खुली सुट देणारी व्यवस्था लागू करण्यात आहे. त्यामुळे नांदेड, नागपूर, औरंगाबाद, ठाणे या ठिकाणी सरकारी रुग्णालयात झालेले मृत्यू दाखवतात की, सरकारी रुग्णालयात डॉक्टर,नर्स व इतर स्टाफ कमतरता आहे. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांची कमतरता आहे. अशी सरकारी खास्ताहाल रुग्णालयांची अवस्था झाली आहे. याचे कारण म्हणजे सरकारचे भांडवलधार्जिणे धोरण आहेत. या धोरणांचा परिणाम गरिबांना या व्यवस्थेमध्ये मरण्यासाठी सोडून दिले आहे.”

पुढे कॉम्रेड अतुल यांनी बोलत असताना सांगितले की, “भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असो किंवा आताचे शिंदे – फडणवीस – पवार सरकार असो हे सर्व भांडवलदार वर्गाची तळी उचलण्याचे काम करत आहेत. या सर्वांचे खरे चरित्र जनतेने ओळखले पाहिजे व आपल्या खऱ्या मागण्याभोवती एकत्र आले पाहिजे.”

विरोध प्रदर्शनात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोग्य मंत्री यांनी घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा व मृत्यू पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना तत्काळ पन्नास लाख रुपये द्यावेत! अशा मागण्यासह आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे यावर भाष्य करण्यात आले.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)

संपर्क – अविनाश – 7499264646

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे