पद्माशाली समाजातील महिलांना गृहउद्योगासाठी मदत करणार – आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर

पदमशाली पंचकमिटी ज्ञाती समाज व श्री मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने आ. संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा अहिल्यानगर च्या विधानसभा सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
या वेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, नगर आकाशवाणी चे प्रमुख राजेंद्र दासरी, मा. नगरसेवक प्रकाश येनगंदुल, समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व देवस्थान कमिटी चे अध्यक्ष गणेश विद्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना आ. संग्राम जगताप म्हणाले पद्मशाली समाज नगर मोठया प्रमाणात आहे. समाजातील तरुण आता उच्च पदावर काम करीत आहे. समाजातील बहूतांशी महिला बिडीकाम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात, सध्या बिडी व्यवसायावर संकट आले असून महिलांना इतर गृह उद्योग करण्यासाठीच नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी समाजाचे वतीने नुकतेच येवला येथील स्थायिक मंगेश गोंटला यांची अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली म्हणून व आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी हे निवृत्त होत असल्याने दोघांचाही सत्कार समाजाच्या वतीने व आ. संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी समजाबाबत माहिती देतांना सांगितले की, नगर शहरात पद्मशाली समाज मोठा आहे, समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याची आवश्यकता आहे, समाजातील गोर गरीब घटकासाठी लघु उद्योग, गृहउद्योग सुरु करण्याची गरज आहे. सोलापूर मध्ये समाजाने ज्या प्रमाणे ब्लड बँक, हॉस्पिटल ची निर्मिती केली त्याच धर्तीवर अहिल्यानगर शहारा मध्ये सुद्धा सुरु करण्याचा मानस आहे या साठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले .
या वेळी देवस्थान कमिटी चे अध्यक्ष गणेश विद्ये यांनी बोलतांना सांगितले की, समाजामध्ये एकी राहावे या साठी आम्ही प्रयत्न करत असून या पुढे समाजातील कोणत्याही घटकाने समाजाचा विकास होण्याच्या उद्देशाने कार्य केल्यास आम्ही सर्व शक्तीने त्यांच्या मागे उभे राहू, समाजात अनेक घरगुती तंटे बखेडे होत असल्याने त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी लवकरच समाजातील विधिज्ञाची एक कमिटी स्थापन करून त्यांच्या मार्फत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय निवडा होण्यासाठी विनामूल्य सहकार्य करण्याचे आश्वासन समाज बांधवांना दिले. सहा. पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, आज समाज बांधवानी माझा सत्कार केल्याने मी भारावून गेलो असून मी नक्कीच समाजासाठी माझ्या परीने व माझ्या पोलीस खात्याचे वतीने सहकार्य करील. तसेच आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, आज पर्यंत मी प्रशासनाचे काम करीत होतो आता मी निवृत्त झालो असल्यामुळे या पुढे समाजासाठी माझ्या अनुभवाचा नक्कीच उपयोग करेल.
या वेळी पद्मशाली समाजातील सामाजिक कार्यकर्ते रवी दंडी, नल्ला महाराज, गणेश येनगंदुल, ऍड राजू गाली, ऍड अन्नलदास, विनोद बोगा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले, स्वागत पुरषोत्तम बुरा यांनी केले तर आभार अमित बुरा यांनी मानले.
या वेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्रिलेश येनगंदुल, अभिजित चिप्पा, प्रणित अनमल, पुरषोत्तम सब्बन, अंबादास गोटीपामुल, गिरीश चिट्टा, इंजि. अजय गुरुड,शरद मडूर, सागर सब्बन, कुमार आडेप, राजू बोगा, धनंजय येनगुपटला, रितेश अनमल आदींनी परिश्रम घेतले. या वेळी कार्यक्रमांस समाजातील डॉक्टर, इंजिनियर, सी ए, वकील, उद्योजक असे सर्व प्रतिष्टीत व्यक्ती मोठया प्रमाणात उपस्थित होते.