ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात मोटारसायकल ची चोरी

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर मध्ये सध्या मोटार सायकल चोरी चे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  मोटारसायकल चोरी विरूद्ध गुन्हा दाखल झाले आहे.

अरबाज जाफर शेख यांची १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल गेवराई रोड, हॉटेल साईबन येथून चोरीस गेली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली.

शेवगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र पुंजारी वाघस्कर यांची १५ हजार रुपये किंमतीची मोपेड (क्र. एमएच १६, बीई ४५५३) बेलेश्वर मंदिरा जवळून चोरीस गेली. ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नंदकुमार ठकाजी गायकवाड यांची २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल मल्हारनगर (नवनागापूर) येथून चोरीस गेली. ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

तसेच ओंकार चंद्रकांत भिंगारदिवे यांची २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल कन्हैय्या डेअरी (नेप्ती चौक) येथून चोरीस गेली. तोफखाना ‘पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तसेच मेघश्याम पापय्या बत्तीन यांची सुझुकी स्विश नवीन कोर्टा समोरील लावलेली गाडी चोरीला गेली आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे