चित्रकार प्राची थिगळे यांना ‘द पॅलेट दिल्ली’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय कांस्य पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील चित्रकार प्राची थिगळे यांना ‘द पॅलेट दिल्ली’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय कांस्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेचे परीक्षण इटलीच्या मेरी जिम्मत, फ्रान्सच्या रिची रॉन आणि भारतातील प्रसिद्ध कलाकार संदीप रावल यांनी केले.
प्राची थिगळे यांच्या कला सादरीकरणातील सर्जनशीलता, रंगसंगती आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली याला आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी मान्यता दिली.
प्राची थिगळे यांना यापूर्वीही समाजभूषण’, भारतज्योती प्रतिभारत्न’, आयडॉल लेडी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्या अहिल्यानगर व परिसरात आर्ट व क्राफ्ट कार्यशाळा घेतात. याशिवाय सामाजिक उपक्रमांमध्येही त्या सक्रिय सहभाग घेतात. त्यांची चित्रे केवळ महाराष्टातच नव्हे तर देशाच्या सीमेपलीकडेही पोहोचली असून, मुंबई, पुणे, जयपूर, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये त्यांच्या चित्रप्रदर्शनांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली आहे.
सध्या थिगळे प्राची क्रिएशन्स’ या नावाने घरूनच पेंटिंग्स, मॉडेल्स, व इतर हँडमेड वस्तूंचा व्यवसाय करत आहेत.