ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वच्छतेच्या माध्यमातून नगरकरांचे आरोग्य राहील निरोगी – महापौर रोहिणी शेंडगे यांचे प्रतिपादन

अहमदनगर

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे. नगर शहरात विविध ठिकाणी स्वच्छतेबाबतचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

नगरकरांनी स्वच्छ पंधरवडा अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जेणेकरून या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती होईल व आपले शहर स्वच्छ सुंदर राहील. स्वच्छता अभियानामध्ये लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. नागरिकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे. स्वच्छतेच्या माध्यमातून नगरकरांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ सिद्धीबाग येथे महापौर शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपयुक्त अजित निकत, श्रीनिवास कुऱ्हे, पर्यावरण दुत सुरेश खामकर,मुख्य लेखाधिकारी विशाल पवार, घनकचरा विभाग प्रमुख सपना वासावा, प्रभाग समिती क्रमांक अधिकारी राकेश कोतकर, शहर अभियंता मनोज पारखे, पाणि पुरवठा अभियंता गणेश गाडळकर, स्वच्छ सर्वेक्षण कक्ष प्रमुख प्रशांत रामदिन, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, सौरभ पवार उपस्थित होते.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार व मनपाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती होत असते, त्यासाठी स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे.

महापौर शेंडगे, आयुक्त डॉ. जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे, उपायुक्त कुऱ्हे, उपायुक्त निकत, लेखा अधिकारी विशाल पवार यांनी स्वच्छता अभियानात भाग घेऊन सिद्धीबागेत स्वच्छता केली. मेरी मिठ्ठी मेरा देश या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे