वाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

वाघ-बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांचे वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी रात्री अहमदाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे.
मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. वॉकवर जात असताना ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे घोषित केले होते.
मात्र, त्यांचा प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग गेल्या एक आठवड्यापासून रुग्णालयात होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते.