ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोथिंबीरसह मेथी, शेपूने आणला काटा ३० रुपयाला गड्डी, भाजीपालाही कडाडला

अहमदनगर

महागाईने एकीकडे कंबरडे मोडले असताना आता भाजीपाला कडाडला आहे. कोथिंबीरसह मेथी शेपूने देखील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे.

अनेक भाज्यांनी प्रतिकिलो ८०-१०० रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडला आहे. कोथिंबीरची जुडी किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपयांपर्यंत तर इतर पालेभाज्याही ३० रुपये गड्डीपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना चांगलीच आर्थिक झळ बसत आहे.

एका जुडीचे तीन भाग करण्याची काहींची शक्कल

नगर बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. बाजार समितीत कोथिंबीरच्या १०० जुड्यांना दीड हजार ते ३ हजारांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे मंडईत दर किरकोळ एका जुडीला दर ३० ते ५० रुपयांपर्यंत गेला आहे. परंतु ग्राहक एक जुडी ३० रुपयांना घेण्यास टाळाटाळ करत असल्याने काही लोक एका जुडीचे तीन भाग करून १० ते १५ रुपयांप्रमाणेही विक्री करण्याची शक्कल लढवत आहेत.

असे आहेत भाजीपाल्यांचे दर

कोथिंबीर – ३० ते ५० रुपये जुडी

मेथी – २५ ते ३० रुपये जुडी

दोडका – ६० ते ८० रुपये प्रतिकिलो

भेंडी – ६० ते ८० रुपये प्रतिकिलो

शेवगा – ८० ते १०० रुपये प्रतिकिलो

वांगी – ६० ते ८० रुपये प्रतिकिलो

कोबी – २० ते ३० रुपये प्रतिकिलो

फ्लॉवर – ४० ते ६० रुपये प्रतिकिलो

वाटाणा – १०० ते १२० रुपये प्रतिकिलो

गवार – ८० ते १२० रुपये प्रतिकिलो

घेवडा – ८० ते १०० रुपये प्रतिकिलो

शेपू – २५ ते ३० रुपये जुडी

पालक १५ रुपये जुडी

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे