अहमदनगर येथे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्तीवंदन कार्यक्रम संपन्न
अहमदनगर

अहमदनगर येथे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्तीवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी धनश्री ताई विखे पाटील उपस्थित राहून सर्व महिला भगिनींनी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी चित्राताईंनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन करून देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा देखील लाभ घेण्याचे आवाहन महिलांना केले.
महिला सक्षमीकरण करणे हा विषय आता केवळ महिलांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्यापुरताच मर्यादित राहिला नसून देशाच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलणारा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
या अनुषंगानेच आज सर्वत्र भाजपाच्या वतीने शक्तीवंदन अभियान राबवून देशातील समस्त महिलांना विकासाच्या प्रवाहात कसे आणले जाईल याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम आज जिल्ह्यातील प्रत्येक महिलेस सक्षम बनविण्यास चालना देत आहे.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देत त्यांनी उत्पादित केलेला माल हा बाजारात उपलब्ध होण्यासाठी विविध प्रदर्शने देखील राबविले जातात.
यासोबतच महाविम अंतर्गत ४८ बचत गटांना स्टॉल भेटले असून त्यापैकी ३ स्टॉलचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात केले. तसेच शेगडी वाटप, बचत गटांना कर्जाचे वितरण असे अनेकविध उपक्रम महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात सक्षमपणे राबविले जात असल्याची माहिती चित्राताईंना दिली.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आज जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अनेकांनी लाभ घेतला आहे.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच राज्यातील महायुतीच्या सरकारच्या विकासात्मक वाटचालीने आज महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे मत यावेळी मांडले आणि सदरील कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यात उपस्थित राहून महिला भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले याबद्दल मा. चित्राताई वाघ यांचे विशेष आभार मानले.