ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ताब्रेकिंग

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

अहमदनगर प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति कोलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार आहेत.

नवीन टोमॅटो बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढून टोमॅटोचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे पुढेही असेच भाव टिकून राहातील अशी अपेक्षा बाळगुन अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली.

मात्र आता भाव कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. तर दुसरीकडे गेल्या एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतीतील पिकांनी आता माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आहेत ती पिके करपत आहेत त्यामुळे पुढील पिकांचा विषयच नाही. एकीकडे पिण्याच्यासाठी पाण्याची चिंता असताना आता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर शेतमालाची आवक घटल्याने महागाई वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे