ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहिल्यानगरचे साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांच्या हवेलीचे रहस्य या बालकादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अहिल्यानगर

कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून त्यामध्ये अहिल्यानगरचे साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांच्या हवेलीचे रहस्य या बालकादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती सभेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.
सदर पुरस्कार वितरण रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता करवीरनगर वाचन मंदिर , भवानी मंडप कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम , सन्मानचिन्ह ,शाल आणि श्रीफळ असे आहे. ..
डॉ. संजय बोरुडे यांचे बालसाहित्यातील हे पहिलेच पुस्तक असून अन्य वाङ्मय प्रकारातील एकूण २४ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या यशाबद्दल साहित्याक्षर प्रकाशन / हिंदी अनुसंधान केंद्र, अहिल्यानगर / अनहद फौंडेशन कोलकाता यांनी अभिनंदन केले आहे .