संस्था FHDAF – फाउंडेशन फाॅर होलिस्टिक डेव्हलपमेंट इन ॲकेडेमिक फिल्ड यांच्या ग्रुप शी दिलखुलास गप्पा..
अहमदनगर प्रतिनिधी

संस्था – FHDAF -फाउंडेशन फाॅर होलिस्टिक डेव्हलपमेंट इन ॲकेडेमिक फिल्ड . नेमके काय आहे ही संस्था.. काय काम करते ही संस्था..
प्रथमतः या संस्थेचे कार्य चार स्तंभां मध्ये आहे. ते काय आहे ते पाहु..
१) EHSAS – Enhancing Harmony by Serving Above Self For Jammu n Kashmir Students. जम्मु काश्मिरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे व त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे. जम्मू काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग रहावा हे पुढील पिढीला कळावे व त्याप्रमाणे त्यांच्याकडूनही असेच प्रयत्न करावे ह्यासाठी आपली संस्था कार्यरत आहे.
नुकतंच १८ ते २१ मार्च रोजी जम्मु काश्मिर आणि लडाखचे विद्यार्थी , जे की पुणे, मुंबईतील काॅलेजमध्ये सध्या शिकत आहेत , त्यांच्यासाठी entrpreneour conference आयोजीत केली होती आणि ती यशस्वी झाली. विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक आपल्या ह्या बिझनेस मिटमध्ये सहभागी होउन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. एग्झिबिशनमध्ये स्टाॅल्सवर उभं राहून विक्री कशी करायची ते सुध्दा ह्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळालं. माधुरीताईंनी विविध उपक्रम ह्या निमित्ताने राबवले आहेत.
२) Mothers on Wheels – २०१६ साली दिल्ली ते म्यानमार हे ईशान्य भारतातील राज्यांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेतली . त्यानंतर २०१८ साली अन्य तीन महिलांना घेउन दिल्ली ते लंडन अशी २२ देशांची भ्रमंती केली. २३००० + किलोमिटरचा प्रवास ह्या चौघींनी ६० दिवसांत केला. ह्या भ्रमंतीत प्रत्येक देशातील , त्या त्या प्रांतातील संस्कृती, तेथील मातांच्या समस्या जाणून घेतल्या. आता जून ते सप्टेंबर असा साउथ ईस्ट एशियाचा दौरा माधुरीताई आणि त्यांच्या सहकार्यांनी सुनियोजित केला आहे.
३) गुरुमाता – सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या मुलांचे भविष्य उज्वल व्हावे ह्यासाठी गुरुमातेचे श्रेष्ठत्व जास्त आहे. प्रत्येक शिक्षकाबरोबर त्याच्या पत्नीने सुध्दा ही जबाबदारी घ्यावी. आपल्या घराच्या आजूबाजूला रहाणार्या महिलांनी आपल्या आसपासच्या मुलांकडून काही चुका होत असतील तर त्या निदर्शनास आणून देवून त्या कशा सुधारता येतील हे पहावे. ह्यासाठी सुध्दा सामाजिक भान जपण्याकरीता संस्था मार्गदर्शन करत आहे.
४) वसुधैव कुटुंबकम्
१ ) डिसेंबर २०२० मध्ये आठ देशांतील विविध क्षेत्रातील ३२ महिला आपल्या फाउंडेशनने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भारतीय धार्मिक संस्कृती, खाद्य संस्कृती, विविध भाषा, वेशभूषा, विविध राज्यांतील वातावरण ह्याचा अभ्यास केला. तेथील सणांचा आनंद लुटला, आणि विविधतेत एकतेचा अनुभव घेतला.
२) करोनाकाळात सर्वत्र नकारात्मक वातावरण असतांना माधुरीताईंनी प्रत्येक घरातील महिलेचे मानसिक स्वास्थ्य सकारात्मक करण्यासाठी फार मोठे पाऊल उचलले. श्रीशिवतांडव स्तोत्र पठणासाठी महिलांना शिकण्यासाठी आवाहन केले. महिलांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
एकत्र येउ शकत नाही तर ऑनलाईन पठणवर्ग सुरु करुन दोन ते अडीच हजार महिलांना हे कठीण वाटणारे स्तोत्र सुलभ करुन शिकवले. त्यासाठी त्यांना त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड प्रमाणात सहकार्य केले. ह्याचाच परिपाक म्हणून ८ मार्च २०२१ रोजी वाराणसी येथील अस्सी घाटावर अकराशे + महिला व बालकांनी हातात दिप प्रज्वलन करुन स्तोत्र पठण केले. ह्या कार्यक्रमाची जगभराने नोंद घेतली.
पुन्हा दुसर्या करोना लाटेने संपूर्ण हिंदुस्थानात थैमान घातले असता प्रत्येक राज्याराज्यात स्थानिक पातळीवर पुनश्च हरीओम् करत श्रीशिवतांडव स्तोत्र पठणाचे आयोजन श्रावण महिन्यात करुन पुनश्च हजारो महिलांनी श्री शिवशंकराला करोना काळातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली.
आणि आताही ह्या श्रावण महिन्यात संपूर्ण हिंदुस्थानात राज्याराज्यात स्थानिक पातळीवर श्रीशिवशंकराचे हे स्तुतीस्तोत्र म्हटले जात आहे.
३) सर्वांना अज्ञात असलेले परंतू सकारात्मक उर्जेने पूरेपूर असलेले श्रीरामतांडव स्तोत्र सर्वांना शिकवून धनुष्कोडी रामेश्वरम् येथे १० एप्रिल २०२२ रोजी श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तावर स्तोत्र पठण समापन कार्यक्रम संपन्न झाला. त्यासाठी दोन हजार महिला व बालकांनी श्रीरामतांडव स्तोत्र पठणवर्गाचा लाभ घेतला.
४) आता तर नुकताच २० जानेवारी, २०२३ रोजी श्रीशक्ति कालीमातेचे तंत्रार्गत श्रीकालीतांडव स्तोत्र समापन कोलकाता येथील श्रीब्रह्मदत्तधाम येथे संपन्न झाले. समस्त स्त्रीशक्तिमध्ये वास करत असलेल्या कालिकेच्या सकारात्मक उर्जेला हे आवाहन होते. सुमारे पाचशे मातांसह सौ.माधुरीताईंनी श्री काली मातेला हे आवाहन केले.
ह्यावर्षीचं तांडव स्तोत्र मालिकेतील चौथं पुष्प महावीर श्री बजरंगबली च्या चरणी समर्पित आहे . श्रीहनुमानतांडव स्तोत्र मारुतीराया च्या भक्ती, युक्ती आणि शक्तीचं वर्णन ह्या तांडव स्तोत्रात आहे.
आता नुकतेच नारळी पौर्णिमा निमित्ताने श्री मार्कंडेय मंदिरामध्ये श्री मार्कंडेय महामुनी पालखी सोहळ्यात आम्ही सर्वांनी शिव तांडव स्तोत्र म्हणून श्री मार्कंडेय महामुनी चरणी समर्पित केले.
फक्त आध्यात्मिक उन्नती नाही तर शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही संस्था प्रचंड प्रमाणात कार्यरत आहे. मुख्य उद्दिष्ट हे मातांचे मानसिक, सांस्कृतिक सबलिकरण केले तर पुढील पिढी उत्तम घडेल असा विश्वास माधुरीताईंना आहे.
त्वं ही दुर्गा ! त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी, कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्…
दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती अशी देवीच्या तिन्ही रूपांचे दर्शन ह्या आमच्या माधुरीताईंमध्ये दिसते.
अशा या ग्रुप साठी AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी अवंती दीक्षित, स्वाती कुलकर्णी, सुनीता लोंढे तसेच FHD मातृशक्ती द्वारा तांडव परिवारातील सर्व सभासदांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.