ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ऑनलाईन दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

सिद्धिविनायकाच्या नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्या सुपर्नो प्रदीप सरकार आरोपीला दादर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. हा आरोपी मोबाईलद्वारे सिद्धिविनायक मंदिरात ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याच्या कारणाने भाविकांची फसवणूक करायचा. त्यासाठी भाविकांकडून ७०१ ते २१,००० हजार रुपये उकळत होता. तपासात ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले ते सरकारचे असल्याचे पोलिसांना आढळले.

दादर पोलीस आता सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता या सुपर्नोच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दादर पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

उत्सव’ ॲपवरून भाविकांची फसवणूक

पेडर रोड येथील एका गृहिणीने ट्रस्टशी संपर्क साधला आणि दावा केला की तिची २१,००१ रुपयांची फसवणूक झाली आहे. तिने सांगितले की तिच्या वडिलांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची होती म्हणून तिने उत्सव ॲपवद्वारे ऑनलाईन पूजा बुक केली.

त्याच आठवड्यात काही भाविक प्रसाद मागणीसाठी मंदिरात आले. त्यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘उत्सव’ ॲपवरून ऑनलाइन दर्शन आणि पूजा केली असून प्रसाद मंदिरात मिळेल असे सांगितले. यासाठी पैसेही ऑनलाइन पाठविल्याचे हे भाविक म्हणाले.

सिद्धीविनायकाच्या नावाने भाविकांची फसवणूक केल्याने भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. व गुन्हेगाराला लवकरात लवकर योग्य ती शिक्षा देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे