ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मध्ये कांदा २१०० रुपयांचा भाव

अहमदनगर प्रतिनिधी

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ५) कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा भाव मिळाला आहे.

गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव दोन हजारांपर्यंत होते. मात्र शनिवारी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये पडणार आहेत.

नेप्ती कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि.५) तब्बल ३९० ट्रक भरून कांद्याची आवक झाली होती. ७८ हजार ०८८ गोण्यांमध्ये ४२ हजार ९४८ क्विंटल कांदा विक्रीला आला. या पैकी एक नंबर कांद्याला १७०० ते २१०० रुपये प्रती क्विटल भाव मिळाला तर दोन नंबर कांद्याला ११०० ते १७०० रुपये प्रती क्विंटल, तीन नंबर कांद्याला ५०० ते ११०० ते रुपये प्रती क्विटल आणि चार नंबर कांद्याला १५० ते ५०० रुपये प्रती क्विटल भाव मिळाला आहे.

कांद्याचे भाव वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती मार्केट मध्ये विक्रीला आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, सचिव अभय भिसे व संचालक मंडळाने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे