
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती.
त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोने चांदी खरेदीदारांसाठी महत्वाची अपडेट आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे.
या आधीच्या दिवशी देखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,170 रुपये आहे. तर जयपूरमध्ये एक किलो चांदीची किंमत 73500 रुपये आहे.
जागतिक कमोडिटी मार्केटमध्ये ढवळून निघाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वेगवान हालचाली होताना दिसत आहे. या महिन्यात देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचे दर सुमारे 2 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58 हजार 380 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भावही प्रतिकिलो 70 हजार 400 रुपये आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदरावरील निर्णय आणि महागाईसह दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सराफा बाजारावर दबाव दिसून आला आहे. याचाच परिणाम म्हणून फेडच्या निर्णयामुळे 10 वर्षांच्या रोखे उत्पन्न आणि डॉलरमध्ये ताकद दिसून आली.
त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव आला. परिणामी, ऑगस्टमध्ये देशांतर्गत वायदे बाजारात सोने 1160 रुपयांनी स्वस्त झाले. तसेच चांदीही पाच हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीत थोडी मजबूती आहे. कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $1920 वर व्यापार करत आहे. मात्र, सोन्याची पातळी 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. तर चांदी प्रति औंस $22.86 वर व्यवहार करत आहे.
असे असले तरीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होणार असल्याचे कुंवरजी येथील रवी डायरा यांनी सांगितले. MCX वर 58 हजार रुपयांच्या स्टॉपलॉसने सोने खरेदी करू असे त्यांनी सांगितले.
यासाठी 58 हजार 700 रुपयांचा स्टॉपलॉस आहे. ही चांदी 69 हजार 700 च्या स्टॉपलॉससह खरेदी करता येईल. चांदी 70 हजार 700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.