ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात गणित, विज्ञान व कला प्रदर्शनाचे उद्घाटन

अहमदनगर

सर्वात महत्त्वाचा वाटा शिक्षक व आई-वडीलांचा असतो. चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीना पुढे जाण्याची संधी आहे. पुढे जाण्याची व ध्येय गाठण्याची वृत्ती ठेवावी. शाळेत होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. हारण जिकणे चालू राहते, पण स्पर्धेत उतरणे महत्त्वाचे असते. अलीकडच्या काळात पोलीस, आर्मी, एअरफोर्स याठिकाणी सुध्दा मुली काम उत्तमपणे कामगिरी बजावत आहे. मुली मुलांपेक्षा कमी नसून, आपले कर्तृत्व सिध्द करण्याचे मुलींना आवाहन केले.

प्राचार्या वासंती धुमाळ म्हणल्या की, कुठलाही शोध लागत असेल, तर तो गरजे पोटी लागत असतो. ए.आ. मुळे जगात झपाट्याने बदल होणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी संशोधकवृत्तीने प्रकल्प बनविण्याचे त्यांनी सांगितले. तर मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

या प्रदर्शनात 280 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थिनींना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या विविध विषयांची पुस्तके ठेवण्यात आली होती. तसेच कला प्रदर्शनात पेन्सिल स्केच, विविध चित्रांचे विद्यार्थिनीनी रेखाटन केले होते. कागदापासून मासा, अक्रोडा पासून कासव, फोटो फ्रेम, वॉल हैंगिंग, पणती डेकोरेशन, आकाश कंदील यांसारख्या विविध हस्तकलेचे वस्तू विद्यार्थ्यांनी सुबकरीत्या तयार केल्या होत्या.

गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थिनीनी बेरीज, वजाबाकी, आधीचा नंबर नंतरचा नंबर, भारतीय चलन, वाहतूक नियंत्रण, पौष्टिक अन्न, वाहतूक, विविध प्रकारच्या घरांची प्रतिकृती, पाण्याची बचत, नैसर्गिक रित्या शेती, समतोल आहार, हायड्रोलिक पूल, नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण यांसारख्या उपकरणांची मांडणी केली होती. प्रास्ताविक छाया सुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गुंड व जयश्री कोतकर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे