
भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. पुण्यातल्या चांदणी चौकचं उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्ताने भाजपने मोठे होर्डींग पुण्यात लावले आहेत.
हेच होर्डींग पाहता भाजपच्या माजी नेत्या मेधा कुलकर्णी यांनी आपले वेदना सांगितल्या. आणि यामुळे भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर अली आहे. माझ्या सारख्या निष्ठावंत नेत्यांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न आहे का? अशा प्रकारची पोस्ट त्यांनी ट्विटर अकाउंटवरून केली आहे.