ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्येष्ठ सिंधी भाषा संशोधक, लेखक प्रा. लछमन हर्दवाणी यांचे निधन

पुणे

सिंधी भाषा तज्ज्ञ, अनुवादक, कोशकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. लछमन हर्दवाणी (वय 81) यांचे बुधवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुन्या पिढीतील उत्तम लेखक, अनुवादक आणि कोशकार गमावल्याची भावना प्रा. हर्दवाणी यांच्या निधनानंतर साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे.

प्रा. हर्दवाणी सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये लिहिणारे लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची 90 पुस्तके प्रकाशित झाली असून सिंधी हायकू हा साहित्य प्रकार त्यांनी लोकप्रिय केला होता.

सिंध प्रांतात जन्माला आलेले प्रा. हर्दवाणी फाळणीनंतर आई-वडिलांबरोबर पुण्याला आले. पुण्यातून एम. ए. केल्यानंतर ते नगरच्या महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक झाले. स्वतःची मातृभाषा असलेल्या सिंधी बरोबरच त्यांनी हिंदीचे अध्यापन केले. प्रा. हर्दवाणी यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध अशा मराठीतील अक्षरवाङ्‌मयाचे सिंधी भाषेत भाषांतर केले.

ते नगर सिंधी एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन सदस्य होते.

प्रा. हर्दवाणी यांची सिंधी, मराठी आणि हिंदी या भाषांत आजपर्यंत 90 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मतानुसार, संस्कृतपासून निघालेल्या सिंधी भाषेची मूळ-स्वाभाविक लिपी देवनागरीच आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात तिची लिपी अरेबिकमध्ये कृत्रिमरीत्या करण्यात आली होती.

हर्दवाणी यांनी गेल्या 40 वर्षांत आपली बहुतेक पुस्तके देवनागरी लिपीत मुद्रित करून स्वखर्चाने प्रकाशित केली होती. प्रा. हर्दवाणी यांनी मराठी संतसाहित्यामधील अनेक ग्रंथ सिंधी भाषेत अनुवादित करून महत्वाचे कार्य केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे