ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यात 16 ऑगस्टपासून जोरदार पावसाची शक्यता, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही मुसळधार- हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

अहमदनगर प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

अशात पुढील सहा दिवस तरी राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र, राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. रावेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्यात 11 व 12 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला.

अडीच महिने पावसाचे

रावेर येथे पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले. पुढील अडीज महिने पावसाचे आहेत. राज्यात या काळात मुसळधार पाऊस होणार असून सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे ते म्हणाले.

आज तुरळक ठिकाणी पाऊस

सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते पावसाच्या सरी पडत आहेत. आज राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, मान्सून कमजोर झाल्याने राज्याच्या अनेक भागात मुख्यतः पावसाची उघडीप आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.

राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष

राज्यात दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल सरकार विचार करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विखे पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु अजूनही सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे