
राज्यामध्ये मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग १५४ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करणार आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २३ ते ३१ जानेवारी या काळात हे सर्वेक्षण होणार आहे. राज्यातील २७ महापालिका आणि सात कॅन्टोन्मेंट बोर्डामध्येही सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणासाठी प्रशासनातील सव्वा लाखांपेक्षा जास्त अधिकारी – कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.