इनरव्हील क्लबच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी भरीव कार्य करणार – श्रीलता आडेप.
अहमदनगर प्रतिनिधी

इनरव्हील क्लब व्हीनसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ श्रीलता हर्षल आडेप यांचा मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार संपन्न.
“शंभर वर्षांचा इतिहास असणाऱ्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या रूपाने पहिल्यांदा पद्मशाली समाजाला व तेलगु भाषिक महिलेला मिळाली आहे, या संधीचा योग्य वापर करत येणाऱ्या वर्षभरात पद्मशाली महिला सोबतच सर्वच समाजातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक उन्नती साठी भरीव कार्य करणार आहे…!!” असे इनरव्हील क्लब व्हीनस अहमदनगरच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ श्रीलता आडेप म्हणाल्या.
येथील श्री मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा व क्लबच्या नवनिर्वाचित सचिव मेघा बकरे यांचा जिल्हा न्यायालयातील स्टेनोग्राफर ज्योती गाली, गीता एल्लाराम, अमृता मंगलारम, विद्या मंगलारम या महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम होते तर उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल, कुमार आडेप आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
“यत्र नाऱ्यास्तू पुज्यनते , रमांते तत्र देवता…” अर्थात जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवता ही रमतात. आपली भारतीय संस्कृती ही नेहमीच महिलांचा सन्मान करणारी संस्कृती आहे, अश्या या संस्कृतीत वाढलेली, आपल्या पद्मशाली समाजाची एक कन्या आज इनरव्हील क्लब सारख्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेची अध्यक्ष झाली ही समाजाच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे. त्यांच्या माध्यमातून चांगली कामे शहर व परिसरात होतील असा आम्हाला विश्वास आहे, त्यासाठी श्रीलता ताई आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा …..!!” असे आपल्या मनोगतात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
शताब्दी मोहत्सवाच्या निमित्ताने वर्षभरात शंभर उपक्रम आयोजित करणार असल्याचे ही अध्यक्ष व सचिव यांनी सांगितले, तसेच मार्कंडेय मंदिरातील दर गुरुवारी होणाऱ्या महाआरती व महाप्रसाद वाटतो उपक्रमाला दोन हजार रुपयांची देणगी ही दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीनिवास एल्लाराम यांनी केले तर आभार रघुनाथ गाजेंगी यांनी मानले. यावेळी भीमराज कोडम, लक्ष्मण इगे, शिवाजी संदूपटला, विठ्ठल गुंडू, शेखर दिकोंडा, श्रीनिवास वंगारी, दिलीप अडगटला, जोग, कृष्णा संभार, सागर , व्यंकटेश नक्का आदी सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.