ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेने वागावे…. फडणवीस यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशवासीयांना काही महत्त्वाची आवाहनं केली आहेत. त्यामध्ये, वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचे आवाहन योग्य असल्याचं म्हटलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, ते योग्य आहे. गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर वापर करायला हवा, असे म्हणत मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. जगभरात अमेरिका,इस्रायरण-इराण युद्धामुळे तेल आणि गॅसच्या इंधन पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे.

आपल्या बाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात किल्लत आहे. पाकिस्तानमध्ये साडेचारशे रुपये प्रति लिटर तेलाचे भाव झाले आहेत. मात्र, आपल्या प्रधानमंत्री यांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण, ही अडचण जर आपण समजली नाही आणि याचा उपयोग योग्य प्रमाणात नाही केला, तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे, पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय, त्यावर सर्व देशवासीयांनी अंमलबजावणी करावी, असे फडणवीसांनी म्हटले.

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.

पंतप्रधान हैदराबादमध्ये म्हणाले की, आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे