ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अतिक्रमणावर घाव शहराला मोकळा श्वास

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी गंज बाजार परिसरात प्रत्यक्ष पाहणी करत अतिक्रमणाविरुद्ध कडक कारवाई केली. फळ विक्रेत्यांच्या गाड्या तसेच पूजा साहित्य दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेले अतिक्रमण हटवण्यात आले.

गंज बाजार ही शहरातील अत्यंत गर्दीची बाजारपेठ असून येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या अतिक्रमणामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी संकुचित होत होते, परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच पार्किंगची समस्या देखील गंभीर बनत होती.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना मोकळी, सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, यापुढे कोणतेही अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.

स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त अहिल्यानगरसाठी महानगरपालिका कटिबद्ध..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे