ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

LPG – PNG टेन्शन संपलं ? गॅस पुरवठा सुरळीत

इराणमधील युद्धविरामानंतर देशात एलपीजी, पीएनजी तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारनं मोठा खुलासा करत दिलासा दिला आहे.

सरकारकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दररोज सुमारे 1 लाख एलपीजी सिलेंडरची विक्री होत असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले की, एलपीजी वितरक आणि पेट्रोल पंपांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य असून 98 टक्के बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.व्यावसायिक एलपीजी पुरवठा देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या सुमारे 70 टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. 14 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 1 लाख 6 हजार टन एलपीजीची विक्री झाली असून दररोज 6 ते 6.5 हजार टन विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली.5 किलोच्या एलपीजी सिलेंडरबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना सुलभता मिळावी म्हणून ओळखपत्राशिवायही या सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. दररोज सुमारे 1 लाख 5 किलो सिलेंडर विकले जात असून 23 मार्चपासून आतापर्यंत 11 लाख सिलेंडरची विक्री झाली आहे.

सरकारकडून एलपीजीऐवजी पीएनजी वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी देशभरात 2400 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नैसर्गिक वायू पुरवठ्यातही सुधारणा होत असून उद्योग क्षेत्राला सुमारे 80 टक्के आणि खत उद्योगाला 95 टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे