ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री मार्कंडेय पद्मशाली उपवधू वर सूचक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन….!!

अहिल्यानगर

मोफत औषध वाटप ही होणार – नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा – आयोजकांचे आवाहन

अहिल्यानगर मधे समाजसेवेच्या उद्देशाने “एक पाऊल, मानव सेवेसाठी…” या संकल्पनेतून श्री मार्कंडेय पद्मशाली उपवधू-वर सूचक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आरोग्य शिबिर रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात डॉ. सुरेंद्र रच्चा, डॉ. लक्ष्मण वन्नम, डॉ. प्रशांत सुरकुटला, डॉ. शाम गुरुड, डॉ. साईनाथ चिंता, डॉ. योगेश मंचे, डॉ. कुणाल रच्चा, डॉ. भावना पेंडम, डॉ. रत्ना बल्लाळ (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. कंचन रच्चा (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. सुरेखा वन्नम, डॉ. प्रिती सुरकुटला, डॉ. अक्षता बडगु, डॉ. भाग्यश्री पेंडम तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे आदी विविध तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून नागरिकांना विविध आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे.

या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, बालरोग, स्त्रीरोग, दंत तपासणी, नेत्र तपासणी, होमिओपॅथी व आयुर्वेद सल्ला तसेच रक्तदाब, रक्तातील साखर, रक्तगट, थायरॉईड इत्यादी प्राथमिक तपासण्या ही करण्यात येणार आहेत. आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप यावेळी करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन श्री मार्कंडेय पद्मशाली उपवधू-वर सूचक बहुउद्देशीय संस्था यांनी केले असून, विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष सहकार्य म्हणून श्री. प्रणित अनमल तसेच महेश मंगलारप, अरविंद पंतम, आशिष कुर्रे, रितेश आडेप, किरण गरुड, जगदीश रामदीन, दिनेश गुंडू, सौरभ तिरमल, अभिषेक बुरा, महेंद्र आडेप, सिद्धराम श्रीकांत, नरसिंह येमल, नरेंद्र मेरुगु यांचेही सहकार्य लाभत आहे. तसेच विविध क्षेत्रातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून घ्यावी व आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी

श्री. दत्तात्रय जोग – ९२७०० २५००३

श्री. शिवाजी संदूपटला – ९४०५६ ९९५४२

श्री. शंकर नक्का – ९८६०८ ४७१८४.

यांच्याशी संपर्क करावा. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन निरोगी जीवनाकडे एक पाऊल टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे