ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

विखे विरूद्ध लंके निवडणूक खटल्याचा निकाल आला..

अहिल्यानगर

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार नीलेश लंके यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यावर सुनावणी सुरू होती. बराच काळ ही याचिका प्रलंबित राहिली. खासदार लंके यांनी निवडणुकीत गैरमार्गाचा वापर केल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

बुधवारी (८ एप्रिल) या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने डॉ. विखे यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईतही लंके यांनी बाजी मारली आहे.

विखे यांनी २०२४ मध्येच ही याचिका दाखल केली. त्यावेळी इतरही अनेक ठिकाणी अशा याचिका दाखल झाल्या होत्या. त्या पूर्वीच फेटाळण्यात आल्या आहेत. नगरची ही याचिका मात्र प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिली होती. अखेर तिचा निकाल आला.

विशेष म्हणजे यामध्ये विखे यांनी फक्त विजयी उमेदवार लंके यांनाच प्रतिवादी केले होते. सहसा निवडणूक याचिकेत निवडणूक अधिकऱ्यांना आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रतिवादी केले जाते. त्यामुळे त्यांनाही कोर्टात बाजू मांडण्यासाठी यावे लागते. या याचिकेत तसे नव्हते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे