ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गेल्या वर्षांपासून रखडले काम अद्याप पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी केला संताप व्यक्त

अहिल्यानगर शहरात मध्यवस्तीत लहान मोठे काँक्रिटीकरणाचे काम एक वर्ष होवुन गेले. पण अर्धवट काम करुन गेले पुन्हां त्या भागात फिरकलेच नाही.वर्क आऊट निघुन पेमेंट सुध्दा मिळून काम पूर्ण होत नाही . असेच काम शहरात काही ठिकाणी पेंडिग आहेत.

तसेच काम चितळे रोड ते पटवर्धन चौक, नगर वाचनालय ते अमर धाम आठ महिने रखडले होते. नागरिकांच्या वारंवार तक्रार वरुन व मोहरम मुळे वाचनालय ते अमरधाम हा रस्ता पुर्ण झाले. ते पण अर्धवट साईड ब्लॉक टाकने बाकीच आहे. साईटचे खड्डे तसचं गौरीघुमट मंदिर मागील बाजूस बोळीचे काम एक वर्ष होवुन गेलय उखडून ठेवलंय अर्धवट पाईपलाईन काम केलंय  परत बघायला पण आले नाही  रोजच रहदारीचा रस्त्या आत्तापर्यंत कित्येक वयस्कर लोकं पडले. काहींचे हातपाय मोडले मोठाले झाडे वाढलीत घरा समोर कुञे घाण करतात. तरी पण काम पूर्ण होत नाहीत.

असे वाटते ठेकेदारांने मॅनेज केलंय काय कोणचं आवाज उठवत नाहीत. गौरीघुमट मागील बाजूस काँक्रिटीकरण काम थकलेय गनगले गल्लीत बंद आहे चितळे रोड ते लक्ष्मीबाई कारंजा काम बंद आहे , काय चाललंय किती अंत बघातायं नागरिकांचे व्यवसाय वर परीणाम झालाय.

या कामाकडे लक्ष देणारे कोण वाली आहे का नाही , असा प्रश्न नागरिकांना पडलाय, अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सुध्दा काम पूर्ण होत नाहीत, या कडे पालिकेने व आमदार साहेबांनी लक्ष घालावे , असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे