ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

तळागाळातील गोरगरिबांच्या महिलांचे जीवनमान उंचावणे हेच खरे महिला दिनाचे उद्देश महापौर – ज्योतीताई गाडे.

अहिल्यानगर

अहिल्यानगर केंद्र व राज्य शासनाने महिलासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहिर केले असुन त्यांचा प्रत्यक्ष लाभसामान्य तळागाळातील व आर्थिकदृष्या कमकुवत अशा गोरगरिबांना मिळवून देणे यातच ख-या अर्थात महिला दिन साजरा करण्यात आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर म.न.पा.चे नवनिर्वाचित महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले.

भाजप ओबीसी गहिला मोर्चाच्या शहरजिल्हाध्यक्षा स्वाती सिरसुल व नगरसेविका मयुरी जाधव यांच्या संयुक्त विदयमानाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित केल्या प्रसंगी अध्यक्ष पदावरुन महापौरांनी वरील आवाहन केले व या कामी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख अतिथी सौ शितलताई संग्राम जगताप होते.

शहरातील विविध क्षेत्रातील कार्य केलेल्या कतृत्ववान महिलांचे तसेच नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार हा उददेश ठेवून महिलांचे यथोचित सत्कार कार्यक्रम खरोखरच कौतुकास पात्र असुन यामुळे समाजातील महिलांनी केलेले कार्य इतरांना प्रेरणा देणारी असल्याचे विचार सौ शितल जगताप यांनी व्यक्त करून भाजप ओबीसी महिला मोर्चाचे अध्यक्ष स्वाती सिरसुल तसेच नगरसेविका मयुरी जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबददल अभिनंदन केले.

अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांचे संघटन मजवुत होउन त्यांच्या प्रश्नाची वेळीच सोडवणुक करता येईल असे मत भाजप महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे यांनी मांडली.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असून यासाठी आपल्या फडणवीस सरकारांनी अनेक योजना आखले आहेत. मात्र सामान्य व गरजू लोकांनपर्यत पोहचविण्याचे कार्य आपण महिला वर्गाच्यां माध्यमातुन करावी..

यासाठी आम्ही सामुहिक पुढाकार घेवू असे श्वेता झोंड, कालिंदी केसकर, सुजाता औटी, संध्या पावसे, रेणुका करंदीकर,स्वाती पवळे, ज्योती दांडगे, रेखा मैड, उज्वला भांगे, सुरेखाताई जंगम, लिला अग्रवाल इ. महिला कार्यकत्यांनी निर्धार केला.

प्रारंभी महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते पुज्य अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांचे विचार व शौर्य महिलांनी अंगिकार करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी अहिल्येच्या लेकींचा सत्काराच्या कार्याक्रमा अंतर्गत वैष्णवी रोकडे (फॅशन डिझाइन व व्युटिशियन), सुनंदा रच्चा (सी ए), इलाक्षी पाथरे (निवेदिका व गायिका), अॅड सुजाता बोडखे व अॅड वंदना पालवे (महिला अत्याचार मोफत कायदेशिर सल्ला), भावना व भाग्यश्री पेंडम (वैदयकिय सेवा), सुनिता पुंड व अनुजा कांबळे (सौदर्य क्षेत्रात योगदान), पुजा राठोड (लघुउयोजिका), पुजा बेंद्रे (फॅशन डिजायनर), स्नेहा जोशी (पत्रकार व महिला समुपदेशक), दिप्ती दयावनपेल्ली (संगित विशारद), श्रृती बत्तीन (संचालिका ए आर न्युज चॅनल) इ. कर्तृत्ववान महिलांचा तसेच भाजपा चे नूतन नवनिर्वाचित महिला नगरसेविका शारदा ढवण, रोशनी त्रिंबके, सोनाबाई शिंदे, सुनिता कुलकर्णी, वर्षा सानम, आशा कातोरे, शितलताई ढोणे, हरप्रीत कौर यांना स्मृतीचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाअध्यक्ष प्रिया जानवे, कालिंदी केसकर, नगरसेविका शितल ढोणे, महिला बाल कल्याण उपसभापती सौ वर्षा सानप, सौ स्नेहा जोशी, प्रणाली कडूस, श्यामला बोरा इ. मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्थ्यांचे अध्यक्षा सी स्वाती सिरसुल यांनी महिलांनी संघटित होउन महिलांच्या सक्षमिकरणासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. शेवटी नगरसेविका मयुरी जाधव यांनी सर्वाचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे