ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

स्त्रीची एक स्त्री च शत्रू असते ?? लेखिका-कविता परुळेकर-पाटकर यांचा लेख नक्कीच वाचा.

डोंबिवली - मुंबई

मुलगा आणि मुलगी यात तर फक्त एका वेलांटी चा फरक आहे. तरीही काही लोक दोघांमध्ये इतका फरक का करतात? जिथे देवानेच दोघांच्या जन्म प्रक्रियेत नैसर्गिक रित्या काही फरक केला नाही तिथे आपण तर देवानेच निर्माण केलेली माणसं आहोत मग आपल्याला त्यानेच निर्माण केलेल्या मुला-मुलींमध्ये फरक करायचा अधिकार कोणी दिला?

आताचे पालक कितीही उच्च शिक्षित असले तरीही त्यातही काही पालक असे आहेत की ज्यांना मनापासून पहिला मुलगा व्हावा अस वाटत असतं. लोक लाजेखातर कदाचित ते आम्हाला काय कोणी झालं तरी चालेल मुलगा-मुलगी, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला आनंदच होईल, असे बरेच जण म्हणतात पण मनातून मात्र त्यांना एक तरी मुलगा आपल्याला असावा असच वाटतं असतं.

माझ्या अगदी जवळच उदाहरण आहे. माझ्या ऑफिस मध्ये असलेली माझी सहकारी मैत्रीण विशाखा M.Sc झालेली. सासरी खूप प्रॉपर्टी. तिच्या मोठ्या दिराना दोन्ही मुलगे च. त्यांची नावही अगदी लक्षात राहण्या सारखी होती, मोठा कर्तव्य आणि धाकटा संकल्प. विशाखा ला मात्र पहिली मुलगी झाली. फक्त विशाखा आणि तिची सासू सोडून नवरा, सासरे घरचे सगळे आनंदले. विशाखा खूप नाराज झाली पहिली मुलगी झाली म्हणून.

प्रसूती रजे नंतर काही महिन्यांनी ती पुन्हा ऑफिसला जॉईन झाली तेव्हा तिने हे बोलूनही दाखवल. आमच्या पैकी काहींना ते पटलही आणि काहींनी तिची समजुत काढली. ती रोज मुलीचं सगळ व्यवस्थित करून ऑफिस ला यायची खरी पण मनातून नाराजच होती. ऑफिसच्या रूटीन मध्ये १ वर्ष गेलं. विशाखा च्या डोक्यात पुन्हा एकदा चान्स घ्यावा असा विचार चालू झाला तिने तो आम्हा मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये बोलूनही दाखवला. आम्ही तिला समजावलं की अजून तुझी मुलगी १ वर्षाची आहे, लगेच दुसरा चान्स कुठे घेण्याचा विचार करतेस?? तर म्हणाली नाही ग मला मुलगा हवाय, आमची इतकी प्रॉपर्टी आहे त्याला वारस नको का ग, मुली काय ? आज आहेत उद्या लग्न करून सासरी गेल्या की आम्हाला म्हातारपणी कोणाचा आधार ?? इतकी प्रॉपर्टी कोण सांभाळणार?? मला तिच्या बोलण्याच खरोखर खूप आश्चर्य वाटलं.

अशातच काही महिने गेले आणि विशाखा पुन्हा १ दा गरोदर असल्याचं तिने आम्हाला सांगितले, पण यावेळी तरी मला मुलगाच असेल का की परत मुलगीच होईल या काळजीत ही ती असायची. हळू हळू ती खूपच खुश आणि जणू‌ काही तिला मुलगाच होणार अशा विश्वासाने चालायची, वागायची. माझही तेव्हा नवीनच लग्न झालं होत. विशाखा मला ही लवकरात लवकर चान्स घेण्यास सांगायची आणि तुला मुलगा हवा असेल तर मी तुला काही टिप्स देईन असंही विश्वासाने सांगायची. मी तिला म्हणायची, की मला नको ग बाई तुझ्या टिप्स वगैरे. मला मुलगा मुलगी काही झालं तरी खरोखरच आनंद होईल फक्त ते निरोगी आणि नॉर्मल व्हावं इतकीच देवाकडे प्रार्थना. पण तू इतक्या विश्वासाने मुलगा होण्यासाठी कसे टिप्स देणार??? तेव्हा ती उडवाउडवीची उत्तर देऊन म्हणायची की अग तस नाही ग काही ठिकाणी वाचलं, नेट वर सर्च केलं तेव्हा मुलगा होण्यासाठी काही उपाय असतात अस मला कळलं तेच फक्त मी केले आणि तेच तुला संगिन अस, तू फक्त चान्स घेण्यापूर्वी मला सांग. मी ही हसून “हो सांगेन हा अस म्हणून तिला उडवून लावायची पण का कोण जाणे तिला विश्वास होता की तिला मुलगाच होणार.

काही महिने गेले आणि विशाखा चे ९ महिने भरले. आम्ही ग्रुप मधल्या मैत्रिणी तिला शेवटच्या दिवशी ऑफिसच्या गेट पर्यंत सोडायला गेलो आणि गुड न्यूज नक्की कळव अस ओरडून सांगू लागलो. मला आठवत, ती जाताना सुद्धा म्हणाली होती की हो हो कळवायच काय? मुलगाच होणार फक्त केव्हा होणार ते मात्र कळवेन ओके अस म्हणत आम्ही तिचा निरोप घेतला.

रविवारचा सुट्टीचा दिवस होता. मी घरी दुपारी जेवत होते. विषाखाचा फोन आला. अगदी हळू आवाजात म्हणाली कविता मी हॉस्पिटल मधून बोलतेय, माझी डिलीव्हरी झाली, पण तिच्या आवाजात खूप उदासी जाणवत होती.

मी तिला विचारलं, काय ग काय झालं? मी तरीही तिला आनंदाने आणि विश्वासाने विचारले. ती म्हणाली अग मला मुलगी झाली तिच्या बोलण्यातून तिची नाराजी जाणवत होती. मी आश्चर्याने विचारल काय? अग पण मला पुढे काय बोलावं कळतच नव्हत पण तरीही मी तिला समजावून अभिनंदन करून फोन ठेवला. अधे मध्ये आमच फोन वर बोलणं व्हायचं.काही महिन्यांनी ती पुन्हा कामावर रुजू झाली. दुसऱ्या बाळासाठी ती खुश ही होती पण मुलगीच झाली म्हणून नाराज ही. शेवटी न राहवून मी तिला विचारलंच काय ग ? तू गरोदर असताना इतक्या आत्मविश्वासाने मला मुलगाच होणार अस कसं म्हणायची? पण ती उत्तर द्यायला टाळाटाळ करत होती पण ती माझी जवळची मैत्रीण असल्याने मी ही हट्टलाच पेटले आणि विचारल की नाही मला सांग तुला कसं कळल होत की तुला मुलगाच होणार आणि तरीही मुलगी झाली???

तेव्हा एका एम.एस. सी. झालेल्या मुलीकडून मी जे ऐकल ते खरंच विश्वास बसण्या सारखं नव्हतं. ती मला सांगू लागली की कविता तुला तर माहीतच आहे आमची किती प्रॉपर्टी आहे ते, त्यात मला पहिली मुलगीच आणि मोठ्या दिराना दोन्ही मुलगे. त्यामुळे मला ही मुलगा हवा होता म्हणून मी लगेच दुसरा चान्स घेतला, पण मला यावेळी कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की…. पुढे ती बोलायलाच तयार नाही. मी म्हटलं काय सांगितल मिस्टरांना ?? तर मला म्हणते “नको तू ऐकलस तर खूप ओरडशिल मला” मी म्हणाले मी नाही काही बोलणार तुला सांग तर म्हणाली मी. (पतीला ) म्हणाले की आपण आधी चेक करूया की मुलगा आहे का? नाहीतर मुलगी असेल तर….. मी तीच वाक्य पूर्ण ऐकून न घेता “शी विशाखा तू अस कस बोलू शकतेस. तूही एक मुलगीच आहेस ना ” तिने जे उत्तर दिलं ते त्याहुनही लज्जास्पद होत, कारण जे मी तिला बोलले तेच तिचे पती तिला म्हणाले मी ते ऐकून तर आणखीनच भडकले. म्हटलं बघ ते एक पुरुष असून तुला स्त्री भ्रूण हत्या करण्या पासून वंचित करत होते आणि तू ???

एक स्री असून शी. त्यावर ती म्हणाली मला माहित होत की ती खूप भडकशील हे ऐकल तर तुला हे कधीच आवडणार नाही म्हणून मी तुला कधीच हे सांगितलं नाही.

मी म्हटलं पण पुढे ??? तर म्हणाली हो माझ्या मी नी मला खूप समजावलं. त्यांना दुसरीही मुलगीच झाली तरी चालणार होतं, मला नाही. म्हणून मी हट्टाने त्यांना माझ्या बरोबरच औरंगाबादला डॉक्टरांकडे यायला तयार केलं आणि ते ही माझ्या हट्टामुळे यायला तयार झाले.

एका च्या ओळखीने आम्ही औरंगाबाद ला गेलो आणि चेक केलं तर त्यांनी” हो तुमचा मुलाचाच गर्भ आहे अस निष्ठून सांगितलं होत ग” आम्ही खुश होऊन त्याला भरपूर फी पण दिली. म्हणून मी इतक्या ठामपणे मुलगाच होणार अस इतके महिने सांगत होते पण मग … मी म्हटलं “पण मुलगी झाली मग तुम्ही त्या डॉक्टरांना विचारलं नाही??? ” तर म्हणाली मी सांगितलं यांना तर यानी फक्त फोन करून झापला त्याला आणि मला म्हणाले” माती आपण खाल्ली त्याला कशाला दोष द्यायचा मी म्हटलं “हे अगदी बरोबर बोलले तुझे मिस्टर.

कारण खरोखरच तू माती खाल्लीस विशाखा अग मुलानंपेक्षा मुलींना जास्त माया असते आई बाबांची कारण त्या काही वर्षांनी आई बाबान पासून लांब जातात. तू तुझी प्रॉपर्टी मुलींना दे ना. त्यांना चांगलं शिक्षण दे. उद्या त्याही तुमच्या म्हातारपणात तुमचा आधार होऊ शकतील. त्यासाठी मुलगाच कशाला हवाय?” यावर ती ही पश्चाताप ने रडायला लागली.

पण खरच मला आश्चर्य वाटले की जेव्हा एक मुलगी आणि तीही इतकी शिकलेली असताना मुलीचा गर्भ नको म्हणून ति जन्माला यायच्या आधीच दिला संपवण्याचा विचार करत होती. ते म्हणतात ना’ एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्री चि शत्रू असते हे आपल्यातल्या बहुतेक स्त्रिया सिद्ध करतात.

निदान अस करणाऱ्यांनी हा तरी विचार करायला हवा की मुलींनाच संपवलं तर पुढची पिढी तयारच कशी होईल? तुम्ही मुलींना नाही तर पर्यायाने ही मनुष्य जात किंबहुना देवाने निर्माण केलेली ही सृष्टीच संपवण्याचा प्रयत्न करताय कारण मनुष्य जन्माला घालायचं पूर्ण सामर्थ्य किंवा अधिकार हा देवाने नैसर्गिक रित्या फक्त स्त्रीलाच दिलेला आहे, म्हणजे तुम्ही देवाच्या आदेशाचच उल्लंघन करू पाहत आहात. उलट मी तर म्हणेन ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते तो खरंच खूप भाग्यवान असेल कारण ती येतानाच आपल्या सोबत प्रेम, मर्यादा, सहनशीलता आणि आपुलकी घेऊनच जन्माला येते.

ते म्हणतात ना भाग्य से बेटा पैदा होता है और सौभाग्य से बेटी पैदा होती है. म्हणजे १०० पुण्य केल्यानंतर देव तुमच्या पोटी मुलीला जन्म घेऊ देतो म्हणजे ती देवासाठीही किती अनमोल असेल याचा विचार करा आणि आनंदाने तीच स्वागत करा.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे