ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीमहाराष्ट्र

व्यावसायिकाची हत्या गुन्हा दाखल

अहिल्यानगर

​अहिल्यानगर हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरणगाव येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या मिठु कार्तिक दत्त यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेली माहिती अशी की, कोमल फरसान मार्ट आणि हॉटेलचे मालक भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे व जावेद छोटू आतार (दोघे रा. वाळकी) यांच्याशी मयत मिठु दत्त यांचा फर्निचरच्या नुकसानीवरून वाद झाला होता.

याच वादाचा राग मनात धरून आरोपी भाऊसाहेब नांगरे, जावेद आतार आणि त्यांच्या हॉटेलमधील तीन कामगारांनी मिळून ६ मार्च २०२५ रोजी आरणगाव येथील ‘अजय फॅब्रिकेशन’ दुकानात घुसून दत्त यांना लाथाबुक्क्यांनी व शस्त्राने गंभीर मारहाण केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे