ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुलमोहर रोड वरील पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन – महेंद्र गंधे

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील सावेडी परिसरातील अनेक ठीकाणी पथदिवे हे बंद स्थितीत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्याबाबत महापालिकेनी नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करून देखील अद्याप काही लाईट ह्या बंदच आहेत. ह्याबाबतचे निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे दिले.

तसेच लाईटच्या अभावी कुठल्याही प्रकारची चोरी अथवा गैरप्रकार घडल्यास त्यासंबंधीची सर्व जवाबदारी कंपनीची असेल तसेच लवकरात लवकर कारवाई न झाल्यास महानगरपालिकेच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

सावेडी व गुलमोहर रोड भागातील बहुतांशी पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन याभागात वारंवार चोन्या तसेच चेन स्नॅचिंग घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद पथदिव्यांबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून तसेच संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे ही वारंवार तक्रारी करूनही टाळाटाळ करत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये. संबधित कंपनी नियुक्त अधिकारी निलेश पगारे हे कधीही फोन उचलत नाहीत.

त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून संताप व्यक्त करत आहेत. या भागात होणाऱ्या चोरांच्या घटनांना पथदिवे लावणारी संबधीत कंपनीच जबाबदार आहे.

त्यामुळे महानगरपालिकेने गुलमोहर रोड परिसरातील पथदिवे त्वरित दुरुस्त करून सुरु करवेत अन्यथा महानगरपालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिला.

भाजपचे माजी महेंद्र गंधे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन पथदिवे दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे