ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात लाठीचार्ज प्रकरणातील तरुणांना दिलासा, कोर्टाने केला जामीन मंजूर

लाठीचार्ज प्रकरणात अटक झालेल्या नौजवानांना अखेर दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली असून, आदेशाची प्रत (लखोटा) संध्याकाळपर्यंत तयार होण्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा आदेश नाशिक येथील कारागृहात टपालद्वारे पाठविण्यात येणार असून, उद्यापर्यंत सर्व तरुणांची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात अनेक वकिलांनी एकत्र येऊन अटक झालेल्या तरुणांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली. यामध्ये अ‍ॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार, अ‍ॅड. अख्तर सय्यद, अ‍ॅड. शेख फारुख बी., अ‍ॅड. रफिक बेग, अ‍ॅड. एस. आर. सय्यद, अ‍ॅड. जावेद खान, अ‍ॅड. सय्यद वसीम, अ‍ॅड. नवाज शेख, अ‍ॅड. दावर शेख, अ‍ॅड. साकीब शेख, अ‍ॅड. इरफान शेख, अ‍ॅड. अय्युब पठाण, अ‍ॅड. शोएब काजी, अ‍ॅड. अकबर शेख, अ‍ॅड. हमीद जरीवाला, अ‍ॅड. अय्याज बेग, अ‍ॅड. समीर पटेल, अ‍ॅड. अरकान जागीरदार, अ‍ॅड. सलमान जी. शेख, अ‍ॅड. नुमेर शेख, अ‍ॅड. सय्यद ताज, अ‍ॅड. दानिश सय्यद आणि अ‍ॅड. बैजाद सय्यद या वकिलांसह अमन ओ इन्साफ फाउंडेशन अहमदनगरच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांनी विशेष भूमिका बजावली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाठीचार्ज प्रकरणात अटक झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक पातळीवरही समाधान व्यक्त केले जात आहे. कोर्टाच्या आदेशानंतर नाशिक कारागृहातून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे