ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

अहिल्यानगर

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. या कारवाईत सर्व नागरिकांची सुरक्षिततेने सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), भारतीय हवामान विभाग (IMD) व धरण प्राधिकरणाशी समन्वय साधून NDRF पुणे पथक सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी पुणे तुकडी सदैव सज्ज असल्याचे एनडीआरएफ कडून कळविण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे