ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मुसळधार पावसाचा कहर

अहिल्यानगर

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात काल रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे गावातील प्रमुख रस्ते बंद झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. दळणवळण खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाच्या प्रचंड प्रवाहात अनेक गाड्या तसेच जनावरे वाहून गेल्याचे वृत्त आहे. पाणी शिरल्याने काही घरांचेही नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील प्राचीन मंदिरालाही मोठा फटका बसला असून परिसर जलमय झाला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गावकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली असून प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे