ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका वीणा बोज्जा यांचे प्रचारास प्रारंभ..

अहिल्यानगर - बोज्जा यांच्या कामाची पावती मतदार मतातून देतील

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून वीणा श्रीनिवास बोज्जा हे अपक्ष निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मा. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अशोक सब्बन यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, जेष्ठ नागरिक अशोक काळे, मा. आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी सह प्रभागातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी उपस्थितांचे स्वागत करून म्हणाले कोणत्याही राजकीय पक्षांवर विश्वास नसल्यामुळेच अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असून निवडून आल्यानंतर निस्वार्थी पणे प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे म्हणाले.

या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन म्हणाले, राजकारणाने तरुण पिढी बरबाद झाली असून तरुण पिढीने सामाजिक चळवळी कडे वळणे गरजेचे असून चांगले व प्रामाणिक काम केल्यास निश्चित यश प्राप्त होते.

सदर प्रचार फेरी, श्रमिक नगर येथून रेणाविकर कॉलोनी, प्रतिमा कॉलोनी, लोकमान्य नगर, श्रेयस कॉलोनी, भिस्तबाग चौक, पोलीस कॉलोनी, रासने नगर मार्गे सोना नगर चौक येथे समारोप करण्यात आले. 

या वेळी उपस्थितांचे आभार मा. नगरसेविका वीणा बोज्जा यांनी मानले.

सदर प्रचार फेरीत विनायक जोग, राजेंद्र द्यावनपेल्ली, राजू मंचे, अजय कोडम, राजू बुरा, लक्ष्मण अंदे, दत्तात्रय रामगिरी, संदुपटला, चंद्रकांत कोडम, गणेश बिटला, गणेश कोडम, रवि आगरकर, अमित बुरा, मनोज येनगंदूल, नरेश कांबळे, आदिनाथ भोसले, विशाल धात्रक, संजय भालेराव, श्याम पारेकर, विनय गुंदेचा, गणेश येनगंदूल, संतोष रायपेल्ली आदिसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे