ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी वर्गाची सांगता..

अहमदनगर

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाबरोबर गिरवले विविध कलागुणांचे धडे.

बालवयातच मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करुन भावी पिढी निरोगी व सशक्त करण्यासाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शालेय मुला-मुलींचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात खेळाबरोबरच विविध कलागुण मुलांना शिकवण्यात आल्या. नुकतेच शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला.

डॉ. अमेय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उन्हाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद काशीद, चंद्रशेखर म्हस्के, गोरख कोतकर, प्रमोद कोतकर, सचिन अग्रवाल, संदीप भोर, दिनेश कोतकर, डॉ. देवेशकुमार बारहाते, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, रोहिणी कोतकर, पवन कोतकर, भागिनाथ कोतकर, सुभाष नवले, सचिन अकोलकर, सोनाली घिगे, शिल्पा नेटके, सुवर्णा सोले मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात छबुराव कोतकर यांनी शरीर सदृढ असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. आयुष्यात आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. मुलांना उत्तम आरोग्य मैदानी खेळातून प्राप्त करता येणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी बास्केटबॉल या खेळाबरोबरच इतर विविध खेळाचे महत्त्व सांगून मोबाईल मध्ये न गुंतता खेळाकडे वळण्याचे आवाहन केले.

डॉ.अमेय कांबळे म्हणाले की, पालकांनी मुलांना त्यांच्या कलेप्रमाणे मोकळीक द्यावी. त्यांना सतत दबावांमध्ये न ठेवता त्यांच्या मनाची स्थिती नेमकी काय आहे? हे जाणून घ्यावे. वेगवेगळे उदाहरणे देऊन त्यांनी निरोगी शरीरासाठी शारीरिक व्यायाम खूप गरजेचा असल्याचे सांगितले. तर मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती बारहाते, संदीप कोतकर सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे