
नोव्हेंबर प्रमाणेच डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.