
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांशी महत्वाची बातमी आहे. रविवारी मुंबईला जाणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक बघून बाहेर पडा कारण पुणे विभागातील लोनावळा- पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड – खडकी स्टेशन दरम्यान रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
आटोमेटिक सिग्नलिंगचे काम केले जाणार असल्याने रविवारी मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सोबतच लोकल सेवा देखील या दरम्यान, बंद ठेवण्यात येणार आहे.
या सोबतच पुण्याहून तळेगाव साठी ६.४८ ला सुटणारी लोकल क्रमांक ०१५८४, ८.५३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८५ तसेच पुणे येथून लोणावळासाठी ०६.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५८, ९.५७ वाजता सुटणारी लोकल ०१५६२, ११.१७ वाजता सुटणारी लोकल ०१५६४, ३ वाजता सुटणारी लोकल १५६६, ४.२५ वाजता सुटणारी लोकल ०१५६८ रद्द करण्यात आली आहे.
या सोबतच शिवाजीनगरहून तळेगाव साठी ३.४७ वाजता सुटणारी लोकल ०१५८८, संध्याकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल ०१५७० तसेच शिवाजीनगरहून लोणावळा साठी ५.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६० रद्द करण्यात आली आहे.