ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

झिम्मा २’मधील मराठी पोरींचा बॉक्स ऑफिसवर कल्ला, ६ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

नुकताच प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली आहे.

पहिल्याच विकेंडला चित्रपटाने कोट्यवधींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या विकेंडला ५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

तर सोमवारी चित्रपटाने १ कोटी, मंगळवारी ५५ लाख तर बुधवारी ७० लाखांची कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे.

‘झिम्मा २’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाला दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

एका आठवड्यामध्ये चित्रपटाने ७ कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. चित्रपटाचा सध्याचा आलेख पाहता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘झिम्मा’चा पहिला भाग गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सुपरडुपरहिट चित्रपट ठरला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे