ब्रेकिंगमहाराष्ट्र
तेलंगणा राज्याचे राज्यपाल तसेच त्रिपुरा राज्याचे माजी उप मुख्यमंत्री महामहिम श्री जिष्णु देव वर्मा जी यांचा युनिक ट्रॅव्हलस तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन राजभवन पुणे येथे सत्कार
पुणे

तेलंगणा राज्याचे राज्यपाल तसेच त्रिपुरा राज्याचे माजी उप मुख्यमंत्री महामहिम श्री जिष्णु देव वर्मा जी यांचा युनिक ट्रॅव्हलस तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन राजभवन पुणे येथे सत्कार करण्यात आला.
या वेळी युनिक ट्रॅव्हल्स चे संचालक व भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे डायरेक्टर श्री आशिष हिंगमिरे सोबत सह संचालक नाशिकवाला आणि डॉ संकेत खरपुडे उपस्थित होते.
भेटीदरम्यान भारतातील पर्यटन वाढीवर तसेच परदेशी पर्यटक जास्तीत जास्त भारतात कसे येतील यावर चर्चा झाली. यावेळी युनिक ट्रॅव्हल्स चे त्रिपुरा शी असलेली कनेक्शन म्हणजे आगरताळा येथे आयोजित करण्यात आलेले संत संमेलनाच्या २०० हून अधिक VVIP पाहुण्यांची पूर्ण पर्यटन व्यवस्था युनिक ट्रॅव्हल्स ने पार पाडली होती याबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.