ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खा. लंकेंची शिष्टाई, विक्रेत्यांच्या प्रश्नावर तोडगा..तारकपुर बस स्थानकावरील विक्रेत्यांवर बंदी

अहिल्यानगर- तारकपुर बस स्थानकावरील विक्रेत्यांवर बंदी ४० कुटूंबांच्या उपजिविकेचा निर्माण झाला होता प्रश्न

गेल्या अनेक वर्षांपासून तारकपुर बस स्थानकावर विविध खाद्य पदार्थ, थंड पेय, बाटलीबंद पाणी आदींची विक्री करून त्यावर तब्बल ४० कुटूंबांची उपजिविका सुरू होती. तारकपुर आगार प्रशसनाने अचानकपणे या विक्रेत्यांवर बंदी घातल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नात खासदार नीलेश लंके यांनी शिष्टाई करत या विक्रेत्यांना पुन्हा खाद्य पदार्थ व इतर पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.

कुटूंबांची उपासमार सुरू झाल्याने या खाद्य विक्रेत्यांनी त्यांची कैफियत खासदार नीलेश लंके यांच्यापुढे मांडली. खा. लंके यांनी तारकपुर आगारात विक्रेत्यांसह जात प्रशासनाची बाजू समजावून घेतली. कोणत्याही समस्येला पर्याय असतो याची जाणीव असलेल्या खा. लंके यांनी आगार प्रशासन व विक्रेते यांच्यात समन्वय घडवून आणला आणि हा प्रश्न माग लागणार हे दृष्टीपथात आले.

उभयपक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या सर्व विक्रेत्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे हॉकर्सचे परवाणे घ्यावेत, त्यानंतर त्यांना बस स्थानकाच्या आवारात खाद्य पदार्थ अथवा इतर पदार्थ विक्री करण्यास अडचण येणार नाही अशी भुमिका आगार प्रशासनाने मांडल्यानंतर खा. लंके यांनी विक्रेत्यांशी चर्चा केली. विक्रेत्यांनीही परवाणे घेऊन खाद्य पदार्थ विक्री करण्याचे मान्य केले.

या प्रश्नासंदर्भात खा. नीलेश लंके यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर ते तारकपुर बसस्थानकामध्ये आले व या प्रश्नात तोडगा काढल्याबद्दल विक्रेत्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी आगार प्रमुख अभिजित चौधरी, तारकपुर बस स्थानक प्रमुख अविनाश कलापुरे, नगरसेवक भैय्या परदेशी, गणेश साठे, संदीप शिंदे यांच्यासह खाद्य विक्रेते यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे