
छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत अहमदनगर महानगरपालिकेचा 21 वा वर्धापन दिन साजरा..
अहमदनगर महानगरपालिकेचा 21 व्या वर्धापन दिन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपायुक्त सपना वसावा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे ,शहर अभियंता मनोज पारखे, इंजि.वैभव जोशी, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, इंजि.गणेश गाडळकर, सुधाकर भुसारे, सतीश ताठे, किशोर कानडे, आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 21 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर पालिका परिसरही स्वच्छ करण्यात आला होता, तसेच महिला कर्मचाऱ्यांनी आकर्षक रांगोळी देखील काढली होती.