
हडपसर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून घरफाेडी गुन्ह्यांत वाढ झाली हाेती. त्या अनुषंगाने हडपसर पाेलिसांचे पथक घरफाेडी झालेल्या ठिकाणांची माहिती संकलित करुन आराेपींचा शाेध घेत हाेते. सहाय्यक पाेलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांचे पथक पेट्राेलिंग करताना, त्यांना एक संशयित अल्पवयीन मुलगा पाण्याची माेटार घेऊन जाताना दिसला.
त्यास थांबवून त्याच्याकडे चाैकशी केली असता, ताे उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता घरफाेडीचे 4 गुन्हे उजेडात आले. पोलिसांनी या प्रकरणी सदर संशयित 17 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.